******इस्लामी दहशतवाद आणि चीनच्या कात्रीत आदिम पाऊलखुणा ****
मेस आयनाक या अफगाण भाषेतील शब्दचा अर्थ तांबे सापडणारा स्त्रोत असा होतो . काबुल पासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर लोगार या रेताड वाळवंटसदृश भागात हे ठिकाण वसलेले आहे . मेस आयनाक जगभरात चर्चेत येण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दहशतवादाच्या छायेतून पुन्हा स्वताच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या अफगाण सरकारने येथील तांब्याच्या या खनिज संपत्तीचा वापर करण्याचा निर्णय घेतला . त्यासाठी जागतिक निविदाही काढल्या . चीनच्या चायना मेटलज्रिकल कंपनीला त्याचे कंत्राट मिळाले . त्यांना खान्कामास सुरुवातही केली आणि प्रत्येक ठिकाणी थोडे खणल्यानंतर बुद्धमूर्ती . असे करत संपूर्ण १०० एकरांच्या परिसरात सुमारे ५०० च्या आसपास बुद्धमूर्ती आजवर सापडल्या अहेत. दरम्यान , पुरातवतज्ञांना असे लक्षात आले कि , मेस आयनाक हे एके काळी पूर्णपणे बौद्ध शहर होते . आता हे पुरातन शहर कायम राखण्यासाठी आणि इथे खानकामास परवानगी देऊ नये यासाठीच्या एका मोठ्या जागतिक मोहिमेला सुरुवात झाली आहे . या प्रकरणात अफगानिस्तान सरकार आणि चीन या दोघांनीही मोठी पंचाईत झाली आहे आणि हे खाणकाम सध्या थांबलेल्या अवस्थेत आहे . मात्र कोणत्याही परिस्तिथित इथे खाणकाम होणारच असा निर्णय चीनी कंपनीने घेतला असून त्याबद्दल जगभरातील पुरातवतज्ञामध्ये चिंता व्यक्त होत आहे . कारण केवळ बुध्मुर्तीपुर्ताच हा विषय मर्यादित नाही . इथे खूप मोठ्या अशा बौद्ध वस्तीचे , मठाचे, तत्कालीन शहराचे अवशेष सापडलेले असले तरी त्याहीखाली करण्यात आलेल्या उत्खननामध्ये ताम्र्युगातील अवशेषही सापडले अहेत. त्यात तांबे वितळवून त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणारी त्या वेळची भाठ्ठीही सापडली आहे साहजिकच त्यामुळेच
मेस आयनाकचे अस्तित्व हे ताम्र्युगापर्यंत मागे जात असल्याचे संशोधकांना लक्षात आले आहे . अशा प्रकारे प्रचंड विस्तार असलेले जगातील हे दुसरे मोठ्या आकारमानाचे ठिकाण भरले आहे . त्यामुळे आत्ता संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधले गेले आहे .
हे लक्ष वेधले जाण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अफगानिस्तानला असलेला दहशतवादी कारवायांनचा धोका अद्याप कायम आहे . अफगाणीनिंचे जीवन आजही दहशतवादाच्या छायेखालीच सुरु आहे . या पूर्वीच २००१ साली अफगाणीस्तानातील भामियाना येथील जगातील सर्वात उंच बुद्ध शिल्पकृती इस्लामी दह्शात्वाद्यानी तोफगोळयांनी उध्वस्त केली होति. संपूर्ण जगभरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली पण त्याने दह्शात्वाद्याना फारसा फरक पडला नाही . अफगानिस्तान हा एकेकाळी बौद्ध प्रदेश होता , याचे दाखली तर इतिहासात ठायी ठायी पाहायला मिळतात . मत ते ह्युअन श्वांग य अचीनी बौद्ध भिखुचे प्रवासवर्णन असो किंवा मग सापडणारे पुरात्वीय पुरावे असोत . अफगानिस्तानात आपल्या वर्चस्वाखाली असलेल्या सर्व प्रांतामध्ये दह्शात्वाद्यानी इस्लामी नसल्याल्या सर्व घोष्टी नेस्तनाबूत करण्याची मोहीमच चालवली . त्याचा सर्वाधिक फटका बौद्ध संस्कृतीला बसला आहे . असाच धोका या मेस आयनाक प्रांतालाही आहे . अफगाण सरकारने इथे सुरक्षा रक्षक ठेवलेले आहेत पण ते पुरेसे नाहीत . असे इथे काम करणाऱ्या पुरातत्व वाद्यांना वाटते .
येथील जनता मत हि बौद्ध परंपरा हि याच प्रांताची महत्वाची संस्कृती असल्याचे मानते . मात्र या जनतेच्या डोक्यावर दह्शात्वाद्न्यांची टांगती तलवार आहे . बमियनामध्ये घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती एह्ते होऊ नये म्हणून सर्व जन एकत्र आले अहेत. मात्र अफगाण सरकार चीनी कंपनीकडून लिलावाचे पैसे घेऊन बसले आहे . हि रक्कम थोडी थोडकी नव्हे तर तब्बल तीन अब्ज डॉलर्स एवढी आहे . त्यामुळे पैसे वसूल करण्यासाठी इथे तांब्याची खान करणारच असा विडा चीनी कंपनीने उचलेला आहे . त्यांच्या कामाला कोणत्याही क्षणी सुरुवात होणार आहे .
२००७ साली नोवेंबर महिन्यात हा परिसर भादेतात्वर खाणीसाठी देण्याचा निर्णय झाला . ३० वर्षाच्या भाडेपट्ट्याने त्याचा व्यवहार हि झाला आहे . ३ अब्ज डॉलर्स हि चीनने त्याव्दारे केलेली गुंतवणूक हि आजवरची अफगानिस्तान मधली सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक आहे . त्यामुळेच अफगाण सरकार वर यासाठी चीनचा दबाव आहे . आजवरच्या अभ्यासानुसार या बौद्ध शहराच्या खाली जमिनीमध्ये ५. दशलक्ष मेट्रिक तन एवढे तांबे दलेले आहे . तर त्याची
किमत १० अब्ज डॉलर्स हून अधिक आहे . त्यामुळे अफ्गनिस्तन्मधे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे . गेली काही वर्ष येथील खाणकाम थांबलेले होते . आता फार काळ वाट पाहता येणार नाही असा , इशाराच चीनने दिला आहे . त्यांनी पुरात्व्वाद्याना दिलेली मुधी संपत आहे . त्यामुळे आता मानवाच्या या आदिम पाऊलखुनाचे काय होणार , हा यक्ष प्रश्न आहे . त्यासाठी पुरातत्वतज्ञांनी आणि विविध क्षेत्रातील माद्लिनी एकत्र येवून सेव्ह मेस आयनाक हि चळवळ सुरु केली आहे . याच्या प्रसारासाठी त्यांनी ट्विटर, फेसबुक आदि सोशल नेत्वार्किंग्चाही आधार घेतला आहे . 'सेव्हिंग मेस आयनाक' हा माहितीपट तयार करण्यात आला असून जगभरात तो दाखविला जात आहे . या चळवळीच्या माध्यमातून या कामासाठी आर्थिक मदतही गोल केली जात आहे . काही देशामधील नागरीकानहि यात पुढाकार घेतला आहे . मात्र पुढाकार घेत्लेल्यामध्ये बौद्ध भूमी असलेल्या भारताचा किवा भारतीयांचा समावेश फारसा दिसत नाही . हि खेदाची बाब आहे .
सौजन्य :-साप्ताहिक लोकप्रभा
रविवार, २० सप्टेंबर, २०१५
इस्लामी दहशतवाद आणि चीनच्या कात्रीत आदिम पाऊलखुणा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा