शनिवार, ९ एप्रिल, २०१६

ग्रंथालय भेट

ङाॅ बाबासाहेब आंबेङकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त  आदिवासी दुर्गम भागातील एक प्राथमिक शाळा मु पो शेलविहीरे ता.अकोले जि अहमदनगर. येथे ग्रंथालय देण्याचा उपक्रम करण्यात आला.अनेक उपक्रम 125 व्या जयंतीनिमीत्त करण्याचेठरले आहेत त्यातील हा  पहिला उपक्रम काल  दि 03/04/2015 रोजी शेलविहीरे शाळेत संघटनेचे पदाधिकारी, शेलविहीरे गावचे ग्रामस्त आणि ज्यांच्यासाठी उपक्रम होता ते शाळेचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पङला. यामध्ये 150 पुस्तके ( वैज्ञानिक ,भौगोलिक आणि आदर्श व्यक्तीमत्वाची चरीत्र) आणि एक पुस्तकांसाठी कपाट असे दिले ङाॅ बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार , प्रसार आणि वारसा पुस्तकांच्या रूपाने येणार्या भावी पिढीला देण्याने परिवर्तन चळवळीला गती देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. ही कल्पना जरी माझी असली तरी सर्व पुणे 1आणि2 च्या पदाधिकार्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमाची सुरवात ङाॅ बाबासाहेब आंबेङकर आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आरोटे सर यांनी केले.शाळेतील मुलींनी स्वागतगीत तसेच " असू दे असू दे मुलीचा जन्म असूदे" आणि "स्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले गं" अशी प्रेरणादायी गीते सादर केली.शाळेच्या तर्फे संघटनेच्या पदाधिकार्यांचे स्वागत करण्यात आले. संघटनेच्या वतीने श्री सिद्धार्थ भालेराव, सौ सुनिता बुरसे आणि दिपक वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. भारताचे संविधान आणि इतर पुस्तके संघटनेच्या पदाधिकार्याच्या हस्ते देण्यात आली.
वाचन कसं करावं आणि का करावं याच मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षक यांना   विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री एकनाथ बुरसे ,प्रिंन्सीपल एच ए स्कूल पिंपरी, पुणे यांनी केले.

या सर्व कार्यक्रमासाठी  पुणे 1 आणि 2 चे खालील पदाधिकारी उपस्थित होते. श्री गणेश गायकवाङ श्री ढावरे, विलास पवार, शशिकांत जाधव, अजित लेंभे, सुनील सोणवणे, सुहास देशमुख, ज्ञानेश्वर दंदे,राजू लांङगे, सौ रेखा खरात आणि स्वाती म्हस्के मॅङम.

या सर्व उपक्रमासाठी शाळेचे शिक्षक श्री मधूकर भांगरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.       
बाबासाहेबांचे ऋण कधीच फिटणार नाही परंतू आपल्या खालच्या स्तरावर आणि येणार्या भावी पिढीच्या उत्थानासाठी असा उपक्रम करण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि आपल्याबरोबर इतरांनाही यासाठी उद्युक्त करावं हीच यामागची भावना आहे...

शनिवार, १९ मार्च, २०१६

कितनी गिरहें खोली है मैने ,
कितनी गिरहें अब बाकी है ,
       पाव मै पायल ,
       बाहो मै कंगन ,
      गले मै हसली ....
     कमरबंद ,छल्ले  और बिछुवे .....
नाक कान छिदवाये गये और  जेवर जेवर केहते केहते ....
रिती रिवाज कि रस्सियो से  मै जकडी गयी...उफ़्फ़  कितनी तरहा मै पकडी गयी
               अब छिलने लगे  है  हाथ पाव
                 और कितनी खराशे उभरी है ...
  कितनी गिरहें खोली है मैने
  और कितनी रस्सिया उतरी है ...
                 अंग अंग ....मेरा रूप रंग
                मेरे नक्श नैन ..मेरे बोल बैन..,
मेरी आवाज मै कोयल कि तारीफ हुई
मेरी जुल्फ रात ..मेरी जुल्फ सांप..
जुल्फो मै घटा ...
         मेरे लाब गुलाब ..आंखे शराब
          गजले और नज्मे  कहते कहते ..
मै हुसन और इशक़  कि अफ्सानो मै जकडी गयी...
उफ़्फ़ कितनी तऱ्हा मै पकडी गयी ..
मै पुछू जरा .....
आंखो मै शराब दिखी सबको ....आकाश नाही दिखा कोई ..?
सावन भादो तो दिखे मगर ..क्या दर्द नही दिखा कोई ..?
फन कि झिनी सी चादर मै , बुत छिले गये उरयानी के ...
तागा तागा करके पोशाक उतारी गयी ...
मेरे जिस्म पर फन कि मशक हुई
और आर्ट -कला  केहते केहते .. संगमरमर मे मै  जकडी गई ..
उफ़्फ़ कितनी तऱ्हा मै पकडी गई....!
बदला ना कोई ना कोई बदलाव बाकी है
कितनी गिरहें खोली है मैने ,
कितनी गिरहें अब बाकी है ...!!!

गुलजार

सोमवार, २५ जानेवारी, २०१६

साहित्य संमेलनात .....

माणसाची जडणघडण ही त्याच्या लहानपणीच ठरत असते.  शाळेत असताना पुस्तकांशी मैत्री झाली. लहानपणी आमच्या वडिलांनी आणलेले पुस्तक (चांदोबा)आधी वाचण्यासाठी आमची भांडणं होत. वाचनाने एक प्रगल्भता येते हे तेव्हा कुणी सांगितले असते तर खरे वाटले नसते. आज आमच्या आयुष्यात जी काही वैचारिकता आणि सामाजिक बांधिलकी आहे ती केवळ पुस्तकांमुळे आहे. लहानपणी जे हातात येईल ते वाचत असू नंतर मात्र आवङ बदलत गेली. कादंबरी ते चरित्र, आत्मचरित्र हा प्रवास होत गेला.परिवर्तनवादी साहित्य हातात पडल्यावर विचार प्रवाह प्रवाही झाला. ह्या वाचनवेङाने आमच्यातला चांगला माणूस कायम जागृत ठेवला. म्हणून जेव्हा केव्हा पुस्तकांच्या दुकानासमोरून जाताना पाय आपसूकच तिकडे वळतात. ह्या वाचनवेङाने आमच्या घरी स्वतःची एक छोटेखानी लायब्ररीच तयार झाली आहे.फार नाही चारशे एक पुस्तकं असतील.
एवढं सगळं असताना साहित्य संमेलनाकङे आमचे पाय न वळणे शक्यच नव्हते..मग काय आजचा रविवार साहित्य संमेलनासाठीच खर्च करून टाकला...संमेलनाच्या बाकीच्या इतर राजकीय, आर्थिक आणि मतमतांतरे यांच्या विषयी विचार करण्यापेक्षा आपण आपला पुस्तकांविषयी विचार करावा.आपल्या आवडीची पुस्तके विकत घ्यावीत आणि वाचावीत ..इतरांनाही वाचावीत म्हणून प्रयत्न करावा..आजच्या संमेलनात मला हवी असलेली बर्‍याच दिवसापासुन न मिळालेली पुस्तकं मिळाली.काही प्रकाशनाची लिस्ट घेऊन आले. एकूणातच आजचा दिवस एकदम खासच पुस्तकांच्या सहवासात...आणि अजून एक विशेष म्हणजे अनेक लेखक लोक दिसले. पण ह्या सगळ्यात विशेष आनंद झाला तो 'रानकवी' तुकाराम धांडे यांना भेटून..आपला आदिवासी माणूस भेटल्यावर शहरातील दिखाऊ जगात इतक्या सच्चे पणाने प्रत्येक साहित्य संमेलनात सहभागी होत कविता सादर करतात खूपच छान वाटले.....